टेम्पो आणि कंटेनर च्या धडकेत भोर तालुक्यातील पेंजळवाडी गावातील युवकाचा अपघाती मृत्यू
किकवी : पुणे सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत रविवारी(दि.२९) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुपर कॅरी टेम्पो आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात अनिकेत अनिल जगताप (वय २७ वर्षे रा. पेंजळवाडी ता.भोर जि.पुणे) या तरुणाचा अपघातामध्ये गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला आहे.या अपघाता मुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनलाल बेनाजी साळवी, (वय ४० वर्षे,गांगर, जि. चित्तोडगड, राज्य राजस्थान) या व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. सदरील व्यक्ती त्याचा आयशर टेम्पो (एम एच ०४ जे के ०४८७)घेऊन बेंगलोर येथील ट्रॉन्सपोर्टवरून माल घेवुन दीव दमण येथे पोहचविण्यासाठी निघाला असताना अचानक समोरून (एम एच १२ एस एफ ८४९९) सुपर कॅरी टेम्पो ने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. अपघात एवढा भीषण होता की अनिकेत चा जागीच मृत्यू झाला, तर अर्जुनलाल ला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकीत झाली असून पोलिस अंमलदार गणेश लडकत करीत आहेत.