चढ्या दराने विक्री व खत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर आता कारवाई होणार; खते, बियाण्यांच्या तक्रारींसाठी भोर तालुक्यात भरारी पथके तैनात

भोर : खरीप हंगामात भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरात पुरवठा व्हावा. तसेच याबाबतच्या तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यासाठी कृषी विभागाकडून तालुका पातळीवर भरारी पथक स्थापन केले आहे. अशी माहिती पथक प्रमुख तथा तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड व सदस्य सचिव तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली. पाच सदस्यीय भरारी पथकात वजन माप निरीक्षक कृषी मंडळ भोर नंबर एक ,भोर नंबर दोन व नसरापूर येथील कार्यालयातील कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.

काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापिल किमतीनुसार खते विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. ज्या खतविक्रत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे, त्यांनी सुधारित दराप्रमाणेच खते विक्री करावी आणि शेतकऱ्यांनी देखील सुधारित दरांप्रमाणेच खते खरेदी करावीत. सुधारित दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी ठोस पुरवा असणे गरजेचे आहे. अशा तक्रारी आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करून दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आदी स्वरूपाची कठोर करवाई करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांनी सांगितले.

Advertisement

शेतकऱ्यांनी खते, बी बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. तसेच खते, बी बियाणे याविषयीच्या असणाऱ्या तक्रारींसाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.भोर तालुक्यात कृषी सेवा केंद्रे, खते,बी बियाणे औषधे व कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या ४६ इतकी आहे. दुकानदारांना पॉस मशिनद्वारे खते विक्री करण्याची सूचना दिली गेली आहे. पथकामार्फत निकृष्ट दर्जाचे व वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवण्यात येणार असून खत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या, जादा दर मागणाऱ्या तसेच पक्की पावती न देणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पथकाच्या माध्यमातून दुकानांची तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page