कोंढणपुर फाटा येथे सकल मराठा समाज शिवगंगा खोरे यांसकडून लाक्षणिक उपोषण
खेड शिवापूर : महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमधून मराठा आरक्षणा संदर्भात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाज शिवगंगा खोरे(ता.हवेली) यांच्या वतीने कोंढाणपुर फाटा येथील ब्रिज खाली युवकांच्या वतीने आज सोमवार (दि.३०ऑक्टोबर) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित करून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे.