उत्कृष्ट विकासकामाबद्दल भोर तालुक्यातील येवली येथील सरपंच-उपसरपंच यांना आदर्श राजर्षी शाहू पुरस्कार २०२३ प्राप्त
पुणे: राजर्षी शाहू प्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे राज्य स्तरीय आदर्श सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक पुरस्कार सोहळा २०२३ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भोर तालुक्यातील येवली ग्रामपंचायतील सरपंच अंकुशराव पांडुरंग खंडाळे व उपसरपंच प्रशांत बाळासाहेब खंडाळे यांनी सन २०१७ ते २०२२ या काळात ग्रामपंचायत मध्ये केलेल्या विकासकामाबद्ल दखल घेऊन आदर्श सरपंच व उपसरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळा नूतनीकरण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत येवली ते सांगवी रस्ता, गावातील अंतर्गत काँक्रिट चे रस्ते, कोरोना काळात गरजवंतांना धान्य वाटप, सायबेज आशा अंतर्गत पाण्याची टाकी (सीएसआर), जलजीवन योजने अंतर्गत पाण्याची टाकी, गावात आयएसओ तपासणी टीम, ऑनलाईन ग्रामसभा,संगणक व शैक्षणिक साहित्य वाटप, यशवंत घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी, अपंग दिव्यांग अनुदान वाटप तसेच अजून खूप कामे त्यांनी केली. या कामांची दखल घेऊन च त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमावेळी येवली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.