भोर तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश वीर कडे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नेतृत्व
भोर : गुजरातमध्ये सुरत येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील गटाच्या एकदिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व भोर तालुक्यातील नऱ्हे गावातील सुपुत्र सिद्धेश वीरकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्राचा एलिट ‘ड’ गटात समावेश असून या गटात महाराष्ट्रासह पंजाब, केरळ, नागालॅण्ड, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, कर्नाटक या संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना पंजाब,दुसरा सामना केरळ , तिसरा सामना नागालॅण्ड, चौथा सामना हिमाचल प्रदेश , पुडुचेरी पाचवा सामना, तर सहावा अखेरचा साखळी सामना कर्नाटक संघाबरोबर होणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) सचिव शुभेंद्र भांडारकर यांनी जाहीर केलेला संघ असा : सिद्धेश वीर (कर्णधार), यश बोरामणी, दिग्विजय जाधव, हर्षल काटे, अनिकेत नलावडे, अथर्व वणवे, रोहित हडके, अंश धूत, आदित्य लोंढे, साहिल चुरी, दीपक डांगी, श्रेयस चव्हाण, रोशन वाघसारे, रामेश्वर दौड, निहाल तुसामद, प्रथमेश गावडे. राखीव : रुद्रराज घोसाळे, आक्शन काझी, ओंकार मोहिते, आकाश तनपुरे, नचिकेत वेर्लेकर.