हॉटेल मालकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
भुईंज : हॉटेल मालकाची सुमारे ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल आत्माराम भोसले (रा. देवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि हमीदुल्ला पटवेकर (रा. मोमीन मोहल्ला इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भोसले याने प्रतिक प्रवीण जगताप (रा.वाई)यांना तो निखिल फिल्म चा प्रोड्यूसर असल्याचे सांगून त्यांच्याकडे काम करणारे कलाकार व कामगार यांच्यासाठी जगताप यांच्या राजगड कृषी एक्झिक्युटिव्ह लॉजिंग मधील रूम भाड्याने घेऊन तसेच तेथेच संबंधितांची जेवणाची व्यवस्था करण्यास सांगून लॉजिंगच्या भाड्याची रक्कम व जेवणाचे बिल असे एकूण २३ लाख १८ हजार ९८८ रुपयांची फसवणूक केली आहे.
तसेच तालुका वाई येथील जगताप यांच्या हॉटेल रुची पार्क येथे हमीदुल्ला पटवेकर याने मी निखिल फिल्मचा फायनान्स कन्सल्टंट व सहकारी म्हणून काम करीत असून रुची पार्क येथे या फिल्ममध्ये काम करणाऱ्या सहकारी यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगून जेवणाचे बिल भरत नाही असे सांगून भोसले आणि पटवेकर यांनी जगताप यांची तब्बल ४० लाख १८ हजार ९८८ रुपयांची फसवणूक केल्या बाबतची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटने बाबतचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे करीत आहेत.