धक्कादायक! आळंदीत वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
आळंदी : अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणार्या कर्मचार्याने बारा वर्षिय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना आळंदीतील एका संस्थेत शनिवारी(दि.१७ ऑगस्ट) पहाटे पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी व्यंकटेश काशिनाथ माळनूर(रा.आळंदी देवाची) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. याबाबत बारा वर्षीय पिडित विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.
आळंदी देवाची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मध्ये अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे. सोबत वारकरी विद्यार्थीही आहेत. त्या संस्थेत आरोपी व्यंकटेश हा देखरेख ठेवण्याचे काम करतो. तर पीडित मुलगा अनाथ आहे. मुळचा विद्यार्थी बाहेरच्या जील्ह्यातील असून तो आई नसल्याने अनाथ झाला होता. अनाथ असल्याने महिला बाल कल्याण समिती न्यायालयामार्फत त्याची त्या संस्थेत निवास व्यवस्था केली होती.
घटनास्थळावरील निवासी संस्थेत शनिवारी(ता.१७) पहाटे पाच वाजता आरोपी हा पीडित मुलाच्या खोलीत आला. त्याने मुलाला उठवले. टिव्ही रूम मध्ये नेले. तिथे मुलाला मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.याप्रकरणी पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असून सहायक पोलीस निरीक्षक साळी अधिक तपास करीत आहेत.