लोकसभेचं बिगुल वाजलं; निवडणुका सात टप्प्यात; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, ४ जूनला निकाल

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २०  मे, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात ९७ कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page