शिरवळ ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग निधी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस चे वाटप
शिरवळ : बुधवार (दि.१ नोव्हेंबर) रोजी शिरवळ ग्रामपंचायत तर्फे एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्मचारी बांधवांचा कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात मुख्य कार्यक्रम हा दिव्यांव कल्याण निधीचे वाटप हा होता. गेली बरेच वर्षे दीव्यांग बंधू भगिनींना त्यांच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करावा लागत होता. दिव्यांग निधी हा संपूर्ण महसुलाच्या ५ टक्के असतो. तो निधी दीपावली पूर्वी आमच्या खात्यावर वर्ग व्हावा अशी सर्वांची अपेक्षा होती. याची खंत लक्षात घेऊन त्यांना ग्रामपंचायत बॉडी ने तुमचे पैसे नोव्हेंबर च्या पहिल्याच दिवशी जमा होतील असा शब्द दिला होता. या शब्दाला जागून सर्वांच्या मदतीने बुधवार (दि.१ नोव्हेंबर) रोजी दिव्यांग निधी वाटप करण्यात आला. एकूण १६,८६,१६०रुपये निधी आज वाटप करण्यात आला. तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर १० लाख रुपयांच्या आसपास ग्रॅज्युटी वर्ग करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी बोनस वाटप करण्यात आला.६० दिवसांचा घसघशीत बोनस १९,९७,१४० रू. कर्मचाऱ्यांना यानिमित्ताने देण्यात आला. यामुळे त्यांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली आहे. हा कार्यक्रम आनंदात, आणि कोटुंबिक वातावरणात पार पाडल्याचे शिरवळ चे सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहीरभाई काझी व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले.