भोर तालुक्यातील पारवडी येथून युवक बेपत्ता
भोर : भोर तालुक्यातील पारवडी येथील श्रीकांत बाळु लिमण (वय ३४ वर्षे) हा ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजन्याच्या सुमारास जनावरे चारणेसाठी गेला होता. त्यानंतर सायं ६ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील बाळु सखाराम लिमण (वय ६० वर्षे) घरी आले. त्यावेळी श्रीकांत ची आई अल्का यांनी त्यांना सांगितले कि मुलगा श्रीकांत हा दुपारी ३ वाजता बाहेर जातो असे सांगुन गेला आहे, तो अजुन घरी आला नाही, त्यानंतर तो रात्री घरी येईल असे वाटले परंतु तो काही घरी आला नाही म्हणुन श्रीकांतचे मित्र व नातेवाईक यांचे कडे श्रीकांत च्या वडिलांनी चौकशी केली, परंतु तो काही मिळुन आला नाही म्हणून बाळू लिमन यांनी आज सोमवार (दि.६ नोव्हेंबर) रोजी राजगड पोलिस स्टेशन कडे धाव घेतली. त्यांनी सायंकाळी ४:४७ रोजी श्रीकांत हरवल्याची तक्रार राजगड पोलीस स्टेशन यांच्याकडे दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार कोंढाळकर करीत आहेत.
श्रीकांत चे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची ५ फुट ८ इंच, रंगाने गोरा, केस कुरळे, दाढी, अंगामध्ये पांढरे रंगाचा फुल बाध्यांचा शर्ट, निळे रंगाची जिन्स पँट, पायामध्ये बुट आणि बरोबर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी