आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही; वसंत मोरेंनी फोडलं कार्यालय

पुणे : पुण्यात मनसे नेते वसंत मोरे पुन्हा आक्रमक झालेत. अल्पवयीन मुलींना एनजीओच्या ऑफिसमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करणारा पुणे आरपीएफचा कर्मचारी अनिल पवार हा गुन्हा दाखल होऊन महिना होत आला तरी फरार आहे.
पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी एनजीओच्या कार्यालयाची तोडफोड केली. रेल्वे स्टेशन परिसरात एका इमारतीमध्ये हे एनजीओ कार्यालय आहे. अनिल पवार आणि त्याचा साथीदार कमलेश तिवारी यांनी एका अल्पवयीन मुलीवर सलग पाच दिवस याच इमारतीमध्ये बलात्कार केला. रक्षकच भक्षक बनल्याचं हे संतापजनक प्रकरण आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वसंत मोरे यांनी एनजीओच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.

Advertisement

आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे पुढे राहणार नाही, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे. आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अजूनही आरोपी सापडत नाही. आरोपीला ट्रेस करू शकत नाही. तुम्ही त्याला पळायला संधी देताय, असं म्हणत वसंत मोरे यांनी खळखट्याक केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page