कापूरहोळ येथे रस्त्यावरील असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक; समाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकार उघडकीस
कापूरहोळ : पुणे सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे उड्डाणपुला खाली झोपलेल्या असहाय्य महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी(दि. ३१ जुलै) घडली असुन समाजिक कार्यकर्त्यांनी सदर महिलेस राजगड पोलिस ठाण्यात नेल्यावर तीनेच या बाबत पोलिसांना माहीती देऊन दोन आरोपींचे वर्णन सांगितले त्या प्रमाणे पोलिसांनी दोघां आरोपींना तातडीने अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुधाकर उर्फ सुधीर बयाजी पवार(वय ३८ वर्ष, रा. कवळी ता.औसा जि. लातुर सध्या रा. राजगड कारखाना ता.भोर) व राजेंद्र हरिभाऊ यादव(वय ६० वर्ष, रा. पुसेगाव ता.खटाव जि.सातारा सध्या कापुरव्होळ चौकातील भंगार दुकान) अशी दोघां संशयीत आरोपींना अटक केली आहे.
सदर ५० वर्षिय महिेलेस स्वतःचे नाव सांगता येते परंतु गावाचे नाव सांगता येत नाही. ती दोन दिवसापासुन महामार्गावरील कापुरव्होळ येथील उड्डाणपुलाखाली राहत होती. बुधवारी पहाटेच्या वेळी ती पुलाखाली आडोशाला झोपलेली असताना एक दाढी व केस वाढलेला व एक हडकुळा अशा दोन व्यक्तींनी येऊन बलात्कार केल्याचे तीने सांगितले आहे. सदर महिला विवस्त्रावस्थेत तिथे असल्याचे परिसरातील नागरीकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तीला कपडे देऊन राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस ठाण्यात आणल्यावर महिला पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार व दोन व्यक्तींचे वर्णन पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी लगेचच त्या भागात तातडीने चौकशी केली. यादरम्यान त्यांना सुधाकर पवार व राजेंद्र यादव मिळुन आले. त्यांना ताब्यात घेतल्यावर सदर महिलेने त्यांना ओळखले असुन त्यांच्याकडे झालेल्या प्रकारा बाबत चौकशी केली असता दोघेही रात्री पुर्ण नशेत असल्याचे समजले. दोन्ही संशयीत आरोपींना आज गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.