पुण्यातील विविध गडकोटांवर दीपोत्सव साजरा
पुणे : दिवाळीच्या निमित्ताने केवळ घरातच नव्हे, तर विविध गडकोटांवरही दीपोत्सव करून दिवाळी साजरी करण्यात आली. सहस्रो दिवे लावून, पोवाडे, गोंधळ असा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे गुणगान करण्यात आले.
सिंहगड, राजगड, तिकोना, केंजळगड, शिवनेरी, रायरेश्वर, तोरणा, पुरंदर, मल्हारगड अशा विविध गडांवर स्थानिक शिवप्रेमी- दुर्गप्रेमी संघटना यांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.