शिरवळ शिंदेवाडी येथील जुन्या महाड पंढरपूर रस्त्यावरील पाणंद रस्ता खुला करून मिळणेबाबत माजी उपसरपंच माऊली शिंदे यांचे निवेदन
शिरवळ : भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग यांचेकडून शिंदेवाडी फाटा (ता.खंडाळा जि.सातारा) या ठिकाणी उड्डान पुलाचे काम करण्यात येत असल्याने सदरील रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. महामार्ग वळविल्याने तसेच आता पुलाचे काम चालू असलेने तेथे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहे. तसेच वाहतूक वळवल्यामुळे भोर फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहानाची गर्दी होणार आहे. महामार्ग वळविल्याने शेतक-याना व वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शिरवळ शिंदेवाडी येथील जुना महाड पंढरपूर रस्त्यावरील पाणंद रस्ता हा या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता ठरला असता, परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता पूर्ववत केल्यास ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना,गुरे,जनावरे आणि वाहन धारकांना हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. तरी जुना महाड पंढरपूर रस्ता नॅशनल हायवे, सप्तपदी मंगल कार्यालय ते भोर रस्ता (पाणंद रस्ता) खुला करून मिळावा या विनंतीचे निवेदन शिंदेवाडी माजी उपसरपंच माऊली शिंदे व ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय खंडाळा, गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग खंडाळा तसेच मंडलाधिकारी शिरवळ यांना दिले आहे.