रायरेश्वर प्रतिष्ठानच्या शिलेदारांमार्फत सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा
भोर : बदलत्या काळानुसार वाढदिवस हे मोठ्या हाॅटेलात मस्त मेजवाणी,आणि असंख्य मित्रमंडळी असा साजरा होताना सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु भोर शहरात वास्तुविशारद असलेले विनोद बरदाडे यांनी मात्र सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी त्यांच्या पत्नी प्रियंका यांचा वाढदिवस भोर तालुक्यातुल म्हाकोशी गावातील कातकडी बांधवांना कपडे,लहान मुलांचे कपडे,दिवाळी फराळ,दिवाळी फटाके वाटप करुन साजरी केला. समाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.
अर्थिक दृष्ट्या कमकुवत असेलेल्या या बांधवांना जेव्हा दिवाळीच्या सणा निमित्त नविन कपडे मिळाले तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद सर्वांच्या मनाला समाधान देणार होता. वाढदिवसानिमित्त समाजहिताचे काम झाल्याने समाधान वाटले असे प्रियंका बरदाडे यांनी या वेळेस सांगितले.तसेच वास्तुविशारद विनोद बरदाडे म्हणले की आम्ही वाढदिवस मोठ्या हाॅटेलाट साजरा केला असता तर आज या बांधवाच्या चेहर्यावरचे समाधान आम्हाला अनुभवता आले नसते.
या कार्यक्रम प्रसंगी विनोद बरदाडे,प्रियंका बरदाडे,शिवव्याख्याते तुषार साळेकर,श्रीमान प्रतिष्ठानचे सदस्य अदेश गरुड,नवनाथ साळेकर, विकास पवार, तसेच शिवकन्या निलम तुषार साळेकर,सिध्दी वाघ उपस्थीत होते.