खेडशिवापूरात अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर राजगड पोलिसांची कारवाई; तब्बल पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड शिवापूर : राजगड पोलिसांनी खेडशिवापुर(ता. हवेली) गावच्या हद्दीत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिकअप सह तब्बल ३ लाख ८५ हजर ५२५ रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी विजय भीमराव राठोड(वय २५ वर्ष, रा. नऱ्हे आंबेगाव ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडशिवापूर गावच्या हददीतून अवैध दारू व्रिकी करण्यासाठी पिकअप गाडीतून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी खेडशिवापूर येथील सरकारी दवाखान्या जवळ सापळा रचत विविध कंपनीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांसह अवैध दारू वाहतूक करणारी पिकअप(एम.एच. १२ के.पी ०५३५) असा एकूण ३ लाख ८५ हजर ५२५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस प्रमिला निकम, पप्पू शिंदे, राजेंद्र गव्हाणे, अजीज मेस्त्री सहभागी होते.