भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे डंपर दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जखमी
भोर : भोर-शिरवळ मार्गावरील वडगाव डाळ(ता.भोर) येथील वळणावर डंपरच्या धडकेत शिरवळ येथे कामावर जाताना समोरून येणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकी वरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी(दि. १८ जून) घडली. मयत तरुण पान्हवळ(ता.भोर) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पान्हवळ व टीटेघर(ता.भोर) येथील चार तरुण वेगवेगळ्या दोन दुचाकीवर शिरवळ तसेच विंग येथील खाजगी कंपन्यांमध्ये कामासाठी जात असताना वडगाव डाळ येथील त्याच वळणावर डंपर व दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. इतर तीन जण मोठ्या प्रमाणावर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.