भोर तालुक्यातील आंबेघर हद्दीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
भोर : भोर-महाड मार्गावरील भोर तालुक्यातील आंबेघर परिसरातील आंबेघर आणि पिसावरे हद्दीतील बंधाऱ्यात आज सोमवार (दि.२०) रोजी दुपारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून एकच खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्या की खून करून व्यक्तीचा मृतदेह निरा नदीच्या पात्रात टाकला आहे हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी आंबेघरसह पिसावरे पोलीस पाटील आणि सरपंच पोहोचून त्यांनी भोर पोलिसांना घटनेची माहिती दिली. भोर पोलीसांनी लगेचच घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे.