सकल धनगर समाजाच्यावतीने खंडाळा तालुक्यातील निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन
खंडाळा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने निरा दत्तघाट येथे जल समाधी आंदोलन करण्यात आले . त्यात अनेक युवक निरा नदीपात्रात जलसमाधीसाठी उतरले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. सुनिल शेळके, माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके, नगरसेवक सागर शेळके, सत्वशील शेळके तसेच खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे प्रतिनीधी उपास्थित होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.