प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांचा ठाणे येथे “समाजरत्न” पुरस्काराने गौरव
भोर : प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांना रविवार (दि.१९ नोव्हेंबर) रोजी एम. एच. हायस्कूल, शिवाजी पथ, ठाणे येथे झालेल्या गौरव संध्या (२०२३) कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.
भोर तालुक्यातील प्रत्येक गावागावात प्रहार संघटनेच्या माध्यमातून संतोष मोहिते यांनी गोरगरिबांना न्याय देऊन अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली आहे. प्रहार पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे तालुक्यात त्यांच्या कामाची जोरदार चर्चा आहे.
त्यांनी केलेल्या समाजहिताच्या कामामध्ये त्यांनी कोरोना कोविड च्या काळात त्यांनी गोरगरीब जनतेला दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध करून दिले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भोरमधील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, वाहचालक यांना करोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित केले. लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा अशी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने मागणी केली. हरिश्चंद्री येथे महामार्ग लगत भूयारी मार्गासाठी शोले स्टाईल आंदोलन केले. भोंगवली येथे बनावट कागदपत्रे बनवून देवस्थानच्या जमिनीची विक्री करणाऱ्यावर प्रशासनाचा पाठपुरावा करून गुन्हा दाखल करून घेतला.शिरवळ येथील गणेशकुंज सदनिका धारकांना फसवणूक प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. सिद्धिविनायक पतसंस्था नसरापूर मधील १७ वर्षे अडकलेले पैसे लोकांना मिळवून दिले. नसरापूर येथील रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी त्यांनी झाडावर चढून आंदोलन करून रस्ता चांगल्या दर्जाचा करून घेतला. अशी अजून अनेक कामे त्यांनी केली आहेत.
त्यांनी विविध क्षेत्रात केलेले काम हे समाजातील युवकांना दिशादर्शक व आदर्श ठरत आहे. त्यांच्या या पारदर्शक कामाचा आढावा डोळ्यासमोर ठेऊन त्यांना ठाणे येथे “समाजरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.