नसरापूर ते वेल्हा रोडवरील २० आधुनिक बस थांब्यांचे मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन; निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोर-वेल्हेकरांकडून कौतुक
नसरापूर : भोर विधानसभा मतदार संघातील नसरापूर ते वेल्हा या बस थांब्यांचे जुनाट, कळकट रूप बदलून बस थांब्यांना आधुनिक साज देण्यात येणार आहे. तब्बल २० थांब्यांना लवकरच नवीन रूप देण्यात येणार असून त्यांचे भूमिपूजन राज्यसभा खासदार व अवजड उद्योग मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते वेल्हे तालुक्यातील विंझर येथे शुक्रवारी (दि. १२ जानेवारी) दुपारी १ वाजता करण्यात आले. बस थांब्याचे नूतनीकरण हे खासदार जावडेकर यांच्या फंडातून होणार असून भोर-वेल्ह्यातील प्रवाशांची बस थांब्यावरील गैरसोय ओळखून प्रवाशांना थांब्यावर चांगल्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने बस थांब्याचे नूतनीकरण हाती घेण्यात आले असल्याचे या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य जीवन आप्पा कोंडे यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब देशमाने, मा. कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आण्णासाहेब शिंदे, किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर मळेकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव शुभम बेलदरे, पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश कोंडे, सुरज मरळ तसेच विंझर पंचक्रोशितील सरपंच, उपसरपंच आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.