सासवड गोळीबार प्रकरणात दोन जणांना अटक; ‘या’ कारणामुळे केला होता गोळीबार

सासवड : सासवड येथील ‘श्रीशा’ज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल नामदेव टिळेकर (वय ४१, रा. सासवड) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजय संभाजी जगताप(वय ४२ वर्ष), आणि दयानंद संभाजी जगताप(वय ३५ वर्ष) दोघेही (रा. जेजुरी, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरा भाऊ प्रताप संभाजी जगताप याच्यासह गोळीबार करणारे आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी विजय नामदेव टिळेकर(रा. सासवड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement

जखमी झालेला राहुल नामदेव टिळेकर याचे सासवड मध्ये एसटी बसस्थानक समोर सोपाननगर रोडलगत श्रीशा’ ज नावाने आयस्क्रीम पार्लर आहे. तसेच जेजुरी जवळील हॉटेल विठ्ठल चे मालक प्रताप जगताप हे दोघे मित्र होते. दरम्यान प्रताप जगताप याचे त्यांच्या पत्नीशी नेहमी वाद होत असल्याने जखमी राहुलने ते वाद सोडविण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी आरोपी असलेले तिघेही भाऊ फिर्यादीला भेटले आणि आमच्या घरगुती भांडणात तू पडू नको, असे तुझ्या भावाला सांग, नाही तर तुला गोळ्या घालून ठार करील, अशी धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. १८) रोजी दुपारी आरोपींनी मारेकऱ्यांना पाठवून राहुल टिळेकर याच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटना घडल्यानंतर जखमी राहुल टिळेकर याच्यावर हडपसर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, ठसेतज्ञ, श्वानपथकाने पाहणी करून घटनेचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याप्रकरणी आरोपी अजय जगताप आणि दयानंद संभाजी जगताप यांना पोलिसांना अटक केली असून, तसेच गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page