पुण्यातील हडपसर येथे पैशांचा पाऊस पाडतो सांगत १८ लाख रुपये लंपास
हडपसर : पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाचा पाऊस पाडतो म्हणून एका भोंदू बाबाने तरुणाचे १८ लाख रुपये पळवले आहेत. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशाचा पाऊस पाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यातील फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रामार्फत पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली.पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलिस येऊन बाबासह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.
कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत तरुणाची १८ लाख रुपये पळवणारा बाबासह चार जणांवर पुण्यातील हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.