मुळशी तालुक्यात अजून एक हिल स्टेशन; धरण बांधण्याची परवानगी

मुळशी : मुळशी तालुक्यात लवासा सिटी आणि ॲम्बी व्हॅली पाठोपाठ आता आणखी एक गिरिस्थान प्रकल्प (हिल स्टेशन) उभे राहत आहे. मुळशी तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या या हिल स्टेशनला २०१९ मध्ये भांबर्डे येथे धरण बांधण्याची परवानगी दिली आहे.

हा धरण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मुळशीमधील सालतर या गावातील पाटबंधारे तलावातून पाणी उचलण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिली आहे.

Advertisement

सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड किल्ले, धरणे, पावसाळ्यात वाहणारे धबधबे, मुबलक वनसंपदा अशी निसर्गाने दिलेली संपदा यामुळे मुळशी तालुक्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यामुळे या तालुक्यात पर्यटक आकर्षित होतात. लवासा आणि ॲम्बी व्हॅली, असे दोन मोठे हिल स्टेशन् मुळशीमध्ये आहे. आता मुळशीमध्ये भांबर्डे, सालतर या परिसरातील गावांमध्ये सुमारे ५ हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

या प्रकल्पास कुंडलिका नदीखोऱ्यात भांबर्डे येथे स्वखर्चाने धरण बांधण्यास २०१९ मध्ये राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र धरण बांधून पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पासाठी सालतर गावातील लघु पाटबंधारे तलावामधून ०.२७०२ दलघमी इतके पाण्याचा वापराचा हक्क मंजूर केला आहे.याबाबतचे आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव न.गौ.बसेर यांनी जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page