शिवापूर वाडा येथील सराफ व्यावसायिकास लुटणारी सराईत टोळी जेरबंद; साडे सहा लाखाचे दागिने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी

खेड शिवापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवापूर वाडा गावचे हद्दीतील आकांक्षा ज्वेलर्स चे मालक यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर ता. हवेली जि. पुणे) हे दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री ०९ वाजता दुकानातील सोने चांदीचे दागिने घेवून घरी जात असताना कोंढणपूर रोडवर दोन पल्सर मोटार सायकलवरील अनोळखी इसमांनी त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांचे ताब्यातील एकूण ६,५८,००० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत त्यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली होती.

त्यानुसार सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या वतीने सुरु केला असता, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन व सुचना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या. त्यानुसार सदर गुन्हयाचा तपास करत असताना परिसरातील सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हा करून आरोपी हे त्यांच्या कडील दोन पल्सर मोटार सायकलवरून शिवापूर-राठवडे-आंचवणे मार्गे कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. परंतु अनोळखी आरोपीची ओळख पटलेली नसल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर आव्हान होते, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाच्या तपासासाठी आजूबाजूच्या परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे शोध घेऊन रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५ वर्षे, रा. सहकारनगर, पुणे), निखिल भगवंत कांबळे (वय २८ वर्षे, रा. आई माता मंदिर, अप्पर पुणे), निलेश दशरथ झांजे (वय २५ वर्षे, रा. वडगाव झांजे ता. वेल्हे जि. पुणे), शफीक मकसूद हावरी (वय १९ वर्ष रा. इंदीरानगर कुंभारवाडा) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी गेलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे व तीन किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी दिली.

Advertisement

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, राजू मोमीण, अतूल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजित भुजबळ, राहुल घुबे, दत्ता तांबे, निलेश शिंदे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, धिरज जाधव, अक्षय सुपे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस अंमलदार राहुल कोल्हे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page