वरंधा घाटातील अपघात चक्र सुरूच! दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात खंडाळा तालुक्यातील युवकाचा मृत्यू

भोर : सोमवार (दि. ८ जानेवारी) रोजी सायंकाळी वरंधा घाटात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात जयवंत सोपान कराडे (रा.कराडवाडी(अंदोरी) ता. खंडाळा) यांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरंधा घाटातील देवघर (ता.भोर) गावच्या हद्दीत शंकर गोरे (रा.वरंध ता.महाड) हे त्यांच्या पत्नीसह ॲक्टिव्हा मोटरसायकल (एम एच ०६ सी ई ३८४४) वरून महाडकडे जात असताना जयवंत कराडे यांनी त्यांच्या त्याब्यातील नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल भरधाव वेगाने समोरून येऊन रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जाऊन गोरे यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात गोरे हे जखमी झाले असून जयवंत कराडे यांचा मृत्यू झाला आहे. गोरे यांना जखमी करण्यास व कराडे हे स्वतः त्यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याची फिर्याद गोरे यांच्या पत्नी जिजाबाई शंकर गोरे (वय ४२ वर्षे रा.वरंध ता. महाड) यांनी भोर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार विजयकुमार नवले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page