पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून भोर, वेल्हा, सासवड, उरळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, हडपसर, शिक्रापूर आणि शिरुर येथील जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
पुणे : पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी ते जून २०२४ मध्ये भोर, वेल्हा, सासवड, उरळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, हडपसर, शिक्रापूर आणि शिरुर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भोर येथे ८ व २२ जानेवारी, ८ व २१ फेब्रुवारी, ६ व २० मार्च, ८ व २२ एप्रिल, ७ व २१ मे आणि ६ व २० जून.
वेल्हा येथे २ जानेवारी, २ फेब्रुवारी, ४ मार्च, २ एप्रिल, २ मे आणि ३ जून.
उरळीकांचन येथे ४,१८ व २४ जानेवारी, ५,१४ व २६ फेब्रुवारी, ५,१४ व २१ मार्च, ३,१८,व २५ एप्रिल, ३,२० व २७ मे आणि ४,१९ व २६ जून.
हडपसर येथे १७ जानेवारी, २० फेब्रुवारी, १९ मार्च, २३ एप्रिल, १३ मे आणि १८ जून.
शिक्रापूर येथे १० व २९ जानेवारी, १२ व २७ फेब्रुवारी, १२ व २८ मार्च, १० व २९ एप्रिल, ९ व २९ मे आणि १० व २८ जून.
पिरंगुट येथे १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी, ११ मार्च, १५ एप्रिल, १४ मे आणि ११ जून.
शिरुर येथे ३,१६ व २३ जानेवारी, ७,१५ व २२ फेब्रुवारी, १,१८ व २६ मार्च, ४,१६,व २४ एप्रिल, ६,१६ व २२ मे आणि ५,१३ व २५ जून,
जेजुरी येथे २५ जानेवारी, २३ फेब्रुवारी, २२ मार्च, २६ एप्रिल, २४ मे आणि २१ जून.
सासवड येथे ५ व १९ जानेवारी, ९ व १६ फेब्रुवारी, ७ व १५ मार्च, १२ व १९ एप्रिल, १० व १७ मे आणि ७ व १४ जून येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.