केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
भोर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे सर्वेसर्वा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड शाखेच्या नाम फलकाचे भोर येथे उद्घाटन करण्यात आल्याने, उत्साहाचे वातावरण तयार झाले असून नवचैतन्य निर्माण झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले.
भोर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे पहील्यांदाच तालूक्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते, यावेळी शिवतीर्थ चौपाटी भोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी शिवतिर्थाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन केले, यावेळी, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतिश केदारी, प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश सोनवणे जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टीवन जोसेफ, रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुभाष सहजराव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनायक गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे भोर तालुक्याचे माजी अध्यक्ष, अनिल गायकवाड भोर तालुका श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव, रिपाइं नेते बळीराम सोनवणे, युवानेते स्वप्निल पाटोळे, भोर तालुका उपाध्यक्ष सचिन सुर्यवंशी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मिनाज कपूर, भोर शहर अध्यक्ष जितेंद्र सुपेकर शहर उपाध्यक्ष गोपाळ तायडे, सरचिटणीस मनोज रवळेकर, युवानेते प्रशांत जाधव, युवानेते विशाल सपकाळ, नितीन ओव्हाळ, अक्षय गायकवाड यासह रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्यक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षाचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी श्रमिक ब्रिगेडच्या शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्यात वेगळाच उत्साह दिसून आला व सर्व कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुक्यात चळवळ वाढविण्याचा उपस्थित पक्षातील कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना भोर तालुका रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली.