हवेली तालुक्यातील आठ मंडल कार्यालयांचे केले विभाजन, आता असणार २३ मंडल कार्यालये; महसूल विभागातील कामांना येणार वेग. नवीन मंडलांची नावे, समाविष्ट गावे, अधिकाऱ्यांचे नावे, वाचा सविस्तर
हवेली : हवेली तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे आठ कार्यालयांवर येणारा भार, यामुळे नागरिकांची कामे रेंगाळत होती. त्यामुळे आठ मंडल कार्यालयांचे (सर्कल ऑफिस) विभाजन केले असून, तालुक्यात आता २३ मंडल कार्यालये असणार आहेत. विभाजन झाल्यामुळे महसूल विभागातील कामांना वेग येणार आहे. नवीन मंडल कार्यालयांमध्ये मंडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून ही नवीन कार्यालये नागरिकांसाठी आठ दिवसांत सुरू होतील अशी माहिती हवेली तहसीलदार, किरण सुरवसे यांनी दिली.
हवेली तालुक्यात सध्या खेड शिवापूर, खडकवासला, कोथरूड, हडपसर, वाघोली, थेऊर, उरुळी कांचन आणि कळस अशी आठ मंडल कार्यालये आहेत. याव्यतिरिक्त खानापूर-डोणजे, धायरी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज, कोंढवा, महंमदवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी, खराडी, कोंढवे-धावडे, शिवणे, लोणी काळभोर, अष्टापूर, लोणीकंद अशी १५ मंडल कार्यालये नव्याने झाली आहेत.
नवीन मंडलांची नावे व त्यातील समाविष्ट गावे :
मंडलाचे नाव – अधिकाऱ्याचे नाव – मंडलातील समाविष्ट सजा किंवा भाग
पश्चिम भाग
खानापूर – गौतम ढेरे – आंबी, खानापूर, जांभळी, मालखेड, वरदाडे, सोनापूर.
डोणजे – प्रकाश महाडीक – गोऱ्हे खुर्द, गोऱ्हे बुद्रुक, घेरा सिंहगड, डोणजे, मोरदरवाडी, सांबरेवाडी.
खडकवासला – हिंदुराव पोळ – किरकटवाडी, खडकवासला, नांदेड, नांदोशी, वडगाव खुर्द.
धायरी – अर्चना ढेंबरे – धायरी २, धायरी १, नऱ्हे २, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द.
खेड शिवापूर – व्यंकटेश चिरमुल्ला – आर्वी, कोंढणपूर, कोळेवाडी, खेड शिवापूर, गाऊडदरा, जांभूळवाडी, रहाटवडे.
कोंढवे धावडे – भारत रूपनवर – आगळंबे, कुडजे, कोंढवे- धावडे, कोपरे, बहुली, मांडवी खुर्द, सांगरूण.
शिवणे – वर्षा वाडेकर – बालेवाडी, वारजे १, वारजे २, शिवणे १, शिवणे २, सुतारवाडी.
कोथरूड – सूर्यकांत पाटील – कर्वेनगर, कर्वेनगर शिल्लक भाग, कोथरूड, पाषाण, बाणेर १, बाणेर २, भुसारी कॉलनी.
पूर्व भाग
आंबेगाव बुद्रुक – किशोर पाटील – आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक १, आंबेगाव बुद्रुक २, धनकवडी १, धनकवडी २, मांगडेवाडी.
कात्रज – साधना चव्हाण – कात्रज १, कात्रज २, कात्रज ३, कात्रज ४, गुजर निंबाळकरवाडी, भिलारेवाडी.
कोंढवा – संदीप शिंदे – कोंढवे खुर्द १, कोंढवे खुर्द २, कोंढवे बुद्रुक १, कोंढवे बुद्रुक २, कोंढवे बुद्रुक ३, येवलेवाडी.
महंमदवाडी – मिलिंद सेठी – उंड्री, औताडे हांडेवाडी, पिसोळी, महंमदवाडी.
उरुळी देवाची – मनीषा भोंगळे – उरुळी देवाची २, उरुळी देवाची १, वडकी, वडकीनाला, होळकरवाडी.
फुरसुंगी – नामदेव सोनवणे – गंगानगर, ढमाळवाडी, फुरसुंगी, भेकराईनगर, शेवाळवाडी.
हडपसर – शेखर शिंदे – काळेपडळ, साडेसतरानळी, हडपसर २, हडपसर ३, हडपसर १.
खराडी – संदीप शिंदे – खराडी २, खराडी १, मांजरी खुर्द, वडगावशेरी २, वडगावशेरी १.
कळस – सत्यवान लांडगे – कळस, धानोरी २, धानोरी १, लोहगाव, वडगाव शिंदे, विमाननगर.
लोणी काळभोर – नूरजहाँ सय्यद – आळंदी म्हातोबा, कदमवाकवस्ती, तरडे, लोणी काळभोर, सिद्राम मळा.
उरुळी कांचन – नूरजहाँ सय्यद – उरुळी कांचन, उरुळी कांचन दत्तवाडी, कोरेगाव मूळ, शिंदवणे, सोरतापवाडी.
थेऊर – जयश्री कवडे – कुंजीरवाडी, कोलवडी, थेऊर, महादेवनगर मांजरी बुद्रुक, मांजरी बुद्रुक १, मोरेवस्ती मांजरी बुद्रुक.
अष्टापूर – गीताश्री काळे – अष्टापूर, खामगाव टेक, नायगाव, न्हावी सांडस, शिंदेवाडी.
वाघोली – अशोक शिंदे – आव्हाळवाडी, केसनंद, बिवरी, वाघोली उत्तर, वाघोली दक्षिण, वाडेबोल्हाई.
लोणीकंद – संदीप झिंगाडे- डोंगरगाव, पेरणे, फुलगाव, बकोरी, बुर्केगाव, भावडी, लोणीकंद.