उत्रौली अंगणवाडी केंद्रामध्ये चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण
भोर : केंद्र पुरस्कृत “एक पेड मां के नाम” आणि “चिमुकल्यांची वसुंधरा” या अभियानांतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी परिसरात प्रत्येक बालकांच्या नावे एक झाड लावण्यात येत आहे. १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या हस्ते लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असणार आहे.
याचेच औचित्य साधत आज शनिवारी(दि. ३१ ऑगस्ट) उत्रौली(ता.भोर) येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये सकाळी १० ते ११.३० या वेळेत ही विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका मीना शिवतरे, वंदना शिवतरे तसेच पालक संतोष कदम व विद्यार्थी उपस्थित होते.