हिंदवी स्वराज्याच्या राजगड व रायगड दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडल्या जाणार; कोकणात जाण्यासाठी तिसरा मार्ग होणार उपलब्ध, रस्त्याच्या कामासाठी ३० कोटी निधी मंजूर
वेल्हे : वेल्हे तालुक्यासह पुणे जिल्हा कोकणाला जवळच्या अंतराने जोडणार्या भोर्डी (ता. वेल्हे) ते शेवते घाट (महाड) रस्त्याच्या कामासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या राजगड व रायगड या दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. एकूण १३ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी असा एकूण ३० कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. भोर, वेल्हा, मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे वेल्हे तालुकाध्यक्ष नानासाहेब राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले, सीमा राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, संदिप नगिने, शोभा जाधव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, भोर विधानसभा युवक अध्यक्ष अमोल पडवळ, तालुका उपाध्यक्ष गणेश जागडे, शिवाजी चोरघे, रोहिदास पिलाने, महेश जाधव, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी पकंज शेळके, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय सकंपाळ, ‘पीएमपीआरडी’चे अधिकारी आदी उपस्थित होते.