गुन्हे अन्वेषण शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती
पुणे : पोलीस दलात चांगली कामगिरी बजावलेल्या ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून यासंबंधीचे आदेश पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढले आहेत. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांची हवालदारपदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामध्ये अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, समाधान नाईकनवरे आणि सुजाता डेरे कदम यांचा समावेश आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांचा बढती मिळाल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.