पुणे-सातारा महामार्गावर शिवरे(भोर) गावच्या हददीत अज्ञात वाहनाच्या धडकेत केतकावळे येथील २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू
नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) गावच्या हददीत शनिवार (दि. १३ जानेवारी) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास प्रतीक्षा शिवाजी यादव (वय २३ वर्षे, रा. केतकावळे, ता. भोर) या तरुणीला रस्त्यावरून पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालक तिच्या मृत्युस कारणीभुत असून अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. त्यामुळे अज्ञात वाहन चालकाविरूध्द सुरज शरद यादव (वय २५ वर्षे, रा. केतकावळे, ता, भोर) यांनी कायदेशीर तक्रार राजगड पोलीस स्टेशन येथे दिली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण करीत आहेत.