कापूरहोळ-भोर रोडवर संगमनेर गावच्या हद्दीत भरधाव डंपरच्या टायरखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

भोर : कापूरहोळ-भोर मार्गावर नेकलेस पॉइंट जवळ संगमनेर (ता.भोर) गावच्या हद्दीत सोमवारी(१५ जानेवारी) सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला,पुणे) या महिलेचा डंपरच्या टायर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

Advertisement

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, अविनाश गोपाळ येलमकर( वय ३९ वर्षे)  हे त्यांची आई लताबाई येलमकर यांच्या बरोबर मोटार सायकलवरून मुळगाव उदोरी (ता. महाड) येथे कापूरहोळ-भोर मार्गावरून चालले होते. सध्या या संपूर्ण रस्त्याचे काम सुरू असून रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने त्यावरून दुचाकी वाहन चालक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नेकलेस पॉइंट जवळील उतारावर संगमनेर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून अविनाश यांचा तोल जाऊन मोटरसायकल( एम.एच.१२ पी.यु. ३०९३) घसरली त्याच वेळेस त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरच्या(एम.एच.१३ डी.क्यू.००९२) टायर खाली लताबाई येलमकर या महिलेचे डोके सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत चालक पळून गेला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून त्यांनी त्यांनी सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page