खेड शिवापूरला मटका अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ४ जणांवर गुन्हा दाखल
खेड शिवापूर : राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेडशिवापूर (ता. हवेली) येथे पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर कारवाई केली असून ५६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत, ४ जणां विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र किसन कोंडे (रा.खेडशिवापूर ता. हवेली), प्रशांत बजरंग घुले (वय २८ वर्ष, रा. कासुर्डी खे.बा ता. भो), संतोष केशव जानकर (वय. ४३ वर्ष, रा. आंबवणे ता. वेल्हा), रमेश पर्वती जमदाडे (वय ५३ वर्षे रा. शुकवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) कऱण्यात आली.
पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील खेडशिवापूर (ता. हवेली) येथील कोंढणुर फाटा येथे समाधान हॉटेलचे पाठीमागे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यानुसार त्यांनी राजगड पोलिसांचे एक पथक लगेचच सदर ठिकाणी रवाना केले. यावेळी पथकाने घटनास्थळी टाकलेल्या छाप्यामध्ये कल्याण मटका चालविण्यासाठी लागणाऱ्या साधनांसहित एकूण ५६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार किर्वे करीत आहेत.