राहुल गांधी यांचा भोर तालुका भाजपा युवा मोर्चाने केला जाहीर निषेध
भोर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून गुजरातमधील तेली जातीत झाला आहे. ती जात २००० मध्ये ओबीसीत आणली. मोदी यांचा जन्म सामान्य वर्गात झाला. म्हणूनच त्यांनी जात जनगणनेला विरोध केला” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.
त्यातच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष अमर बुदगुडे यांच्या तर्फे भोर तहसील च्या बाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी जातीवाचक विधान करून देशातील संपूर्ण ओबीसी व इतर समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भोर तालुका भाजप युवा मोर्चा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी हे वारंवार समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत असतात. मोदींचा जगभरात असलेला करिष्मा त्यांच्या पचनी पडत नाही अशी टीका यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
या आंदोलनास पुणे जिल्हा युवा मोर्चा चे सरचिटणीस वैभव सोलनकर, तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, शहर अध्यक्ष सचिन कण्हेरकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिजित कोंडे, जिल्हा सचिव प्रमोद साबळे, महिला अध्यक्षा आशा शिवतरे, उपाध्यक्ष राजाभाऊ गुरव, पल्लवी फडणीस, स्वाती गांधी, संतोष लोहोकरे, पंकज खुर्द, दीपक तनपुरे, दीपक मालुसरे, समीर घोडेकर, समीर बांदल, सचिन म्हस्के, रोहन भोसले, केदार साळुंखे, निलेश चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.