उपोषणाचा तिसरा दिवस; मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचारास नकार
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसापासून अन्नाचा कण देखील घेतला नाही. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी रविवारी अंबडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भीमराव दोडके आंतरवाली सराटीत उपोषण स्थळी तपासण्यासाठी आले होते. परंतू मनोज जरांगे यांनी तपासणी करुन घेण्यास नकार दिला आहे. उपचार घेण्यासाठी नकार दिल्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे.
शनिवारपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फेलोशिपपासून वंचित विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे रविवार(११ फेब्रुवारी) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.