राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोर-वेल्हा प्रचारप्रमुखपदी मानसिंग बाबा धुमाळ यांची नियुक्ती
भोर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोर व वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुखपदी मानसिंग बाबा धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्यावतीने धुमाळ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी होणा-या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांकरिता मानसिंग बाबा धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच निवड केल्यानंतर धुमाळ यांचे भोर वेल्हा तालुक्यातील कार्यकर्त्यांद्वारे अभिनंदन केले जात आहे.
एक संघ पणे व एकनिष्ठेने प्रामाणिकपणे शरद पवारांशी एकनिष्ठ राहणारा एक कडवट, कट्टर आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून मनसिंग बाबा धुमाळ यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची भोर व वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुखपदी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भोर-वेल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.