उद्या खंडाळ्यात घुमणार भिर्रर्र…..चा आवाज! उद्योजक नितीन ओहाळ मित्र परिवारातर्फे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
खंडाळा : उद्योजक नितीन ओहाळ मित्र परिवारातर्फे शिवजयंती निमित्त श्री क्षेत्र पाडळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे “साहेब केसरी” भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत “एक आदत, एक बैल, दुसरा बैल” अशी असून उद्या गुरुवारी(१५ फेब्रुवारी) रोजी सकाळी ठीक ९ वाजता सुरू होईल. शर्यतींची प्रवेश फी ऑनलाईन ७०० रूपये ठेवली आहे. या शर्यतींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस एक दुचाकी – ऋषी भैय्या धायगुडे यांच्या सौजन्याने, द्वितीय क्रमांकास ४१,००० रूपये – जंबू शेठ अहिरे(धायगुडे अर्थमूव्हर्स अँड ट्रान्सपोर्ट) यांच्या सौजन्याने, तिसरे बक्षीस ३१,००० रूपये – पोपट धायगुडे, धनंजय धायगुडे, सनी मदने, विक्रम सावंत, खंडेराव भिसे यांच्या सौजन्याने, चतुर्थ बक्षीस १५,००० रूपये – आकाश भैय्या सोनवणे(भैरवनाथ अर्थमूव्हर्स) यांच्या सौजन्याने, पाचवे बक्षीस ११,००० रूपये – विक्रम धायगुडे(सरपंच, मोर्वे), प्रवीण धायगुडे यांच्या सौजन्याने, सहावे बक्षीस ७,००० रूपये – अनिकेत धायगुडे यांच्या सौजन्याने, सातवे बक्षीस ५,००० रुपये – बिरदेव तात्या पिसाळ(बिरदेव अर्थमूव्हर्स) यांच्या सौजन्याने, तसेच ट्रॉफी दत्तात्रय बापू होले आणि सचिन दशरथ धायगुडे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहेत. संपूर्ण बैलगाडा शर्यतीचे नियोजन नवनाथ शेंडगे (लालमाती कुस्ती केंद्र, लोणंद) यांनी केले आहे.