भोरमध्ये घुमणार भिर्रर्र…..चा आवाज! उद्योजक अनिलनाना सावले युवा मंच तर्फे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
भोर : उद्योजक अनिलनाना सावले युवा मंच, वीसगाव- चाळीसगाव खोरेतील तरुणांच्या वतीने शिवजयंती निमित्त वाघजाई देवी मंदिरापाठीमागील मैदानावर “रोहिडा केसरी” भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत “ओपन मैदान” अशी असून २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. शर्यतींची प्रवेश फी १००१ रूपये ठेवण्यात आली आहे. या शर्यतींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी अनिल सावले यांस कडून दुचाकी (टू व्हीलर), द्वितीय क्रमांकासाठी भोरचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्याकडून ४१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी नेरे गावचे सरपंच विजय बढे यांस कडून ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी उद्योजक नवनाथ मानकर यांच्यातर्फे २१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी घोलप यांस कडून १५ हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी युवा उद्योजक कुणाल बुदगुडे यांच्याकडून ११ हजार रुपये, सातव्या क्रमांकासाठी धोंडीबा पाटणे यांच कडून ७ हजार, तर आठव्या क्रमांकासाठी संजय मळेकर यांजकडून ५ हजार रुपये रोख अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रशांत खोपडे यांच्यातर्फे सर्व क्रमांकासाठी ढाल देण्यात येणार आहे. तसेच यूट्यूब वर लाईव्ह ही शर्यत योगेश घोलप, निलेश दळवी यांच्या सौजण्याने दाखवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन अक्षय पवार, संतोष शिवतरे , राहुल पाटणे, शिवाजी बढे, मयूर थोपटे, योगेश घोलप, निलेश दळवी, सागर दरेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन उल्हाळकर ९६५७१०१०७० यांस संपर्क साधावा.