माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांच्या वाढदिवसा निमित्त भोर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
भोर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकनेते अनंतरावजी थोपटे यांच्या वाढदिवसा निमित्त आज शनिवारी (दि. ११ जानेवारी) अनंतराव थोपटे महाविद्यालय फार्मसी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अभिषेक येलगुडे, राजगड ज्ञानपीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
भोर तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात माजी मंत्री तथा राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे यांनी अनन्य साधारण काम उभे करून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनून सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केल्याने माजी मंत्री थोपटे हे भोर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी असल्याचे या शिबिराप्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्न कुमार देशमुख, प्राचार्य डॉक्टर संध्या चव्हाण, संपर्क अधिकारी श्रीधर निगडे सर, NCC विभाग प्रमुख संदीप उल्हाळकर, प्रा. डॉ. बिचुकले, प्रा. डॉ. मोहिते, प्रा. डॉ. शिंदे, प्रा. महाराज पारखी, प्रा. गायकवाड यांच्यासह विध्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.