शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. विधिमंडळातील संख्याबळावरुन निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले होते. शरद पवार गटाला आता कोणते चिन्ह मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर आज २२ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे.