मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण फलटण तालुक्यात शनिवारी रास्ता रोको

फलटण : मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार २४ फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील प्रत्त्येक गावागावात व प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार असून या आंदोलनाला कोणतेही गालबोट न लावता तसेच सध्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून कोणत्याही मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची खबरदारी सर्व मराठा बांधवानी घ्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण ने केले आहे. कायदेशीर व पन्नास टक्के च्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगेंनी केली होती.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, परंतु राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ व संध्याकाळी ४ ते ७ या वेळी प्रत्येक प्रमुख गावात तसेच मुख्य रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन सनदशीर मार्गाने होणार असून या आंदोलनाला कोणीही हिंसक करू नये किंवा करू देऊ नये तसेच या रास्ता रोकोला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्या लोकांची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण व स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार, किंवा बिट अंमलदार, गाव पोलीस पाटील यांना द्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण ने केले आहे.

तालुक्यात या ठिकाणी असणार आंदोलन
आसू रोड येथील राजाळे येथे, पंढरपूर रोड वाजेगाव येथे, शिखर शिंगणापूर रोड सोनवडी बु. येथे, दहिवडी रोड झिरपवाडी येथे, पुसेगाव रोड वाठार निंबाळकर वाठार फाटा, सातारा रोड बीबी फाटा, लोणंद पुणे रोड बडेखान, तसेच पाडेगाव येथील पूल, बारामती रोड सांगवी, खुंटे येथील नवीन पूल, होळ पूल येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page