शिरवळ येथील फरशी गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान
शिरवळ: सातारा-पुणे महामार्गावरील शिरवळ येथील गजराज टाईल्स या फरशी गोडाऊनला शनिवारी(दि. १६ मार्च) रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणात भस्मसात झाले आहे. आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकानातील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, दुकानातील फरशी, टाइल्स, सॅनिटरी वेअर आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या आगीमुळे सातारा-पुणे रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.