महाराष्ट्र मंदिर महासंघाचा मोठा निर्णय; पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांना बंदी! मंदिरांची संपूर्ण यादी, वाचा सविस्तर

पुणे : जिल्ह्यातील एकूण ७१ मंदिरांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करताना आता तोकडे आणि अशोभनीय कपडे चालणार नाहीत. मंदिरात प्रवेशसाठी ७१ देवस्थानाने वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने ओझर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. यामध्ये भीमाशंकर देवस्थान बरोबर कसबा गणपती सह पुणे शहरातील व पुणे ग्रामीण भागातील मंदिरांचा समावेश आहे. याचा प्रमुख उद्देश फक्त मंदिराचे पावित्र्य जपावे, हाच आहे तरी लोकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

पुणे जिल्ह्यातील या मंदिरात वस्त्रसंहिता लागू
१) श्री ग्रामदैवत कसबा गणपती, पुणे
२) चतुश्रृंगी देवस्थान पुणे
३) श्री भीमाशंकर देवस्थान मंदिर ट्रस्ट, भीमाशंकर
४) खंडोबा मंदिर कडेपठार, जेजुरी
५) श्री म्हस्कोबा देवस्थान मंदिर ट्रस्ट, वीर
६) भूलेश्वर महादेव मंदिर, माळशिरस
७) श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर, देवस्थान बोपगाव
८) श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, नसरापूर, भोर
९) श्री तुकाई माता देवस्थान व सेवा ट्रस्ट, हडपसर
१०) श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, वडज तालुका – जुन्नर, पुणे
११) भैरवनाथ मंदिर देवस्थान, सासवड
१२) सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर
१३) सोरतापेश्वर महादेव मंदिर, सोरतापवाडी
१४) मारुती मंदिर, सोरतापवाडी
१५) म्हस्कोबा मंदिर, कोडीत
१६) अंबामाता मंदिर, वाघळवाडी
१७) मल्लिकार्जुन महादेव मंदिर, मुरुम
१८) गणपती मंदिर, लोणकर मळा
१९) श्री पांडुरंग देवस्थान, मंचर
२०) श्री राधाकृष्ण मंदिर, गोशाळा, हडपसर
२१) जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट (श्रीराम मंदिर),काळबोराट नरार, हडपसर
२२) श्री स्वामी समर्थ मठ, काळपडळ, हडपसर
२३) नायडू गगवानी मंदिर, देहू रोड
२४) श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्था, ज्ञानेश्वर महाराजांनी बेद बोलविलेले रेडा समाधी मंदिर, आळे
२५) शंभू महादेव मंदिर, हिवरे
२६) म्हस्कोबा मंदिर, हिवरे
२७) श्रीनाथ म्हसोबा मंदिर, वडगाव बु. पुणे
२८) श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, रांजणी, तालुका आंबेगाव, पुणे
२९) तपनेश्वर सेवा मंडळ ट्रस्ट, मंचर
३०) श्री. गणेश मंदिर, तुकाई नगर प्रतिष्ठान, पुणे
३१) दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गावडेवाडी, तालुका आंबेगाव, पुणे
३२) वेळेश्वर देवस्थान संस्था, कुरवंडी, तालुका – आंबेगाव, पुणे
३३) यमाई देवी संस्थान, कवठे यमाई तालुका – शिरूर, पुणे
३४) श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबेग तालुका आंबेगाव, पुणे
३५) स्वयंभू मोरया गणपती देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव, पुणे
३६) कमलजा देवी मंदिर संस्था, शेवाळवाडी, मंचर, तालुका आंबेगाव, पुणे
३७) श्री दत्त मंदिर देवस्थान संस्था, चिंचोडी देशपांडे (लांडेवाडी) तालुका आंबेगाव, पुणे
३८) श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान, घोडेगाव तालुका – आंबेगाव, पुणे
३९) श्रीराम मंदिर देवस्थान संस्था, चास तालुका आंबेगाव, पुणे
४०) श्री हनुमान मंदिर देवस्थान संस्था, मांदळेवाडी (लोणी) तालुका आंबेगाव, पुणे
४१) श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, वडगाव पीर तालुका आवेगाव पुणे
४२) श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गाव साकोरे तालुका आंबेगाव पुणे
४३) श्री महादेव मंदिर देवस्थान संस्था, लोणी तालुका आंबेगाव, पुणे
४४) श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, लोणी तालुका आंबेगाव, पुणे
४५) श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, खडकवाडी तालुका – आंबेगाव पुणे
४६) श्री गणेश देवस्थान संस्था, वाळुंजनगर (लोणी) तालुका आंबेगाव, पुणे
४७) श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट गाव धामणी तालुका – आंबेगाव, पुणे
४८) श्री वाकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट, पेठ तालुका – आंबेगाव, पुणे
४९) भार्गव कुदळे पाटील श्रीराम मंदिर, नन्हे
५०) अंबा माता मंदिर, वडगाव (बु)
५१) श्रीराम मंदिर ट्रस्ट, हडपसर
५२) श्री मारुती मंदिर महादेववाडी, हडपसर
५३) श्री विठ्ठल मंदिर महादेववाडी, हडपसर
५४) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, काळे बोराटे नगर
५५) श्री स्वामी मंदिर देवस्थान, हडपसर
५६) धनेश्वर मंदिर, तानाजी नगर, चिंचवड
५७) श्री गजानन महाराज मंदिर, तळेगांव
५८) श्री राम मंदिर, शितलादेवी, देहू रोड
५९) श्री महालक्ष्मी मंदिर, केशव नगर, वडगाव मावळ
६०) कडजाई माता मंदिर, इंदोरी
६१) संत सावतामाळी विठ्ठल मंदिर, तळेगांव दाभाडे
६२) केदारेश्वर महादेव मंदिर, तळेगांव दाभाडे
६३) श्रीराम मंदिर, आळंदी
६४) कावड महादेव मंदिर, सासवड
६५) बटेश्वर महादेव मंदिर, सासवड
६६) संगमेश्वर महादेव मंदिर, सासवड
६७) दत्त मंदिर, नारायणगाव
६८) दत्त मंदिर, दत्तघाट, नीरा
६९) हनुमान मंदिर, नीरा
७०) महादेव मंदिर, नीराघाट, नीरा
७१) कातोबा मंदिर देवस्थान, दिवेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page