नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे ३५९१.४६ कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ

भोर : दक्षिण महाराष्ट्राच्या दुष्काळीपट्ट्यासाठी वरदान ठरलेल्या नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला अंतिम मान्यता दिली आहे.

यामुळे या प्रकल्पाला गती येणार असून भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होईल. भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडून निरा देवधर प्रकल्पाला गुंतवणुकीची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.

Advertisement

दक्षिण महाराष्ट्रात जाणारे बहुतांश पाणी बारामती पट्ट्यातच खेचून घेऊन वापरले जात होते. त्यामुळे बारामती पट्ट्याचा विकास झाला, पण फलटण, माळशिरस सारख्या एकेकाळच्या समृद्ध भागाला दुष्काळाचा फटका बसला. नीरा देवधर प्रकल्पासारख्या दक्षिण महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या प्रकल्पाला केंद्र सरकारने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अंतिम मान्यता दिली.

याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले, तसेच या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page