लोकसभा निवडणुकीसाठी भोर प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी राजेंद्र कचरे
भोर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर देशात आचार संहिता लागू झाली. या दरम्यान बारामती लोकसभा मतदासंघांपैकी भोर विधानसभा मतदारसंघासाठी भोर तालुका प्रशासन सज्ज झाली असून त्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी आज सोमवारी(दि. १८ मार्च) दिली.
भोर येथे ३५ बारामती लोकसभा मतदारसंघाचे पंचायत समिती सभागृह आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी कचरे बोलत होते. यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसरा टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान आहे तर मतमोजणी ही ४ जुन रोजी संपन्न होणार आहे. २०३ विधानसभा भोर मतदार संघात एकूण ३९७८४५ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष २११४४५ आहेत, तर महिला १८६३९५ आहेत. तर तृतीयपंथी ५ मतदार आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी ५ फिरती पथके तैनाद करण्यात आली आहे. तसेच ७० क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. असे प्रांताधिकारी कचरे यांनी यावेळी स्पष्ट केले.