राजगड कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटेंची प्रमुख उपस्थिती
कापूरहोळ : राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच भोर विधानसभेचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. आज शुक्रवारी(२७ सप्टेंबर) दुपारी एक वाजता ही सभा निगडे(ता.भोर) येथे कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असून सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील यांनी केले आहे.
मागील वर्षी कारखाना बंद राहिला होता तर या वर्षी प्रशासनाकडून कारखान्याची आर्थिक मदत रोखण्यात आली आहे. या वर्षी कारखाना सुरू होणार की नाही? सुरू होणार असेल तर आर्थिक तरतूद कशी होणार? ऊस उत्पादकांना काय भाव मिळणार? याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.