‘येळकोट येळकोट जय मल्हार…’ सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविक खंडेराया चरणी
जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या तसेच बहुजनांचा लोक देव असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी आपल्या लाडक्या खंडेरायाचे दर्शन घेतले. येळकोट.. येळकोट… जय मल्हार!! अशा जयघोषात भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.
आज सोमवारी सोमवती असल्याने जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेनिमित्त महाराष्ट्रतूनच नव्हे तर देशभरातून अनेक भाविक भक्त सालाबाद प्रमाणे येत असतात. वर्षाकाठी खंडेरायाच्या जेजुरी मध्ये एकूण आठ यात्रा भरतात त्यामधील महत्त्वाच्या यात्रेमधील सोमवती अमावस्या, वर्षातून साधारण दोन सोमवती अमावस्या पडत असल्याने भाविक भक्त आपल्या लाडक्या खंडेरायाच्या दर्शनासाठी या सोमवती यात्रेनिमित्त गर्दी करत असतात. आज सकाळपासूनच भाविक भक्तांनी जेजुरी गडावरती येण्यास सुरुवात केली खांदेकरी, मानकरी, तसेच पुजारी, सेवकवर्ग, मोठ्या संख्येने दाखल होत होते.
आज पहाटे भूपाळी नित्य पूजा देवाचे कुलधर्म कुलाचार पार पडल्यानंतर दुपारी साधारण एकच्या दरम्यान उत्सव मूर्तींना मुख्य मंदिराच्या समोर आणण्यात आले यावेळी जेजुरीतील खांदेकरी मानकरी पुजारी सेवक वर्ग मार्तंड संस्थांचे विश्वस्त महाराष्ट्रातून आलेले तमाम भावीक भक्त उपस्थित होते. मार्तंड संस्थांचे मुख्य इनामदार राजेंद्र पेशवे यांनी खांदेकरी मानकरांना पालखी सोहळ्यास सुरुवात करण्याचा इशारा देताच “सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हारच्या” घोषात देत भंडारा उधळून खांदेकरी मानकरी यांनी पालखी उचलून सोहळ्यात सुरुवात केली यावेळी इनामदार सचिन पेशवे, त्याचबरोबर माळवदकर पाटील, खोमणे पाटील, मार्तंड देव संस्थांचे सर्व पुजारी सेवक वर्ग, तसेच लाखोच्या संख्येने भाविक भक्त जेजुरगडावर उपस्थित होते.
पालखी सोहळा मंदिरास प्रदक्षणा घालत असताना भाविकांनी मनसोक्त भंडाऱ्याची उधळणी बरोबर “येळकोट येळकोट जमल्हार”. “सदानंदाचा येळकोट” आशा गर्जना दिल्या यावेळी जेजुरी गड अक्षरशः पिवळ्याधमक भंड्यारीने न्हाऊन निघाला जेजुरी गडावरून पालखी सोहळा पायरी मार्गे नंदी चौकात येताच चौकातील अनेक भाविकांनी भंडाराची उधळण केली .पालखी सोहळा गौतमेश्वर मंदिरामध्ये पोहोचला तेथील हजारो भाविकांनी देखील सदानंदाचा जयघोष करत होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होता पालखी सोहळा कऱ्हा नदीच्या दिशेने मार्गस्थ होत असतानाच जेजुरी गावामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जेजुरी पोलीस स्टेशन यांनीजेजुरीतील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते .त्यामुळे गावातून पालखी सोहळा व्यवस्थित मार्गस्थ होत होता. जेजुरीच्या बाहेर पालखी सोहळा पडतात दुपारची कडक ऊन त्याचबरोबर खांदेकऱ्या मानकरां साठी पिण्याच्या पाण्याचे बरोबरच पायमोजे टोप्या नियोजन मार्तंडदेवसंस्थान संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
सायंकाळी पाचच्या सुमारास कऱ्हानदीच्या काठावरील रंभाई शिंपीन तीर्थक्षेत्राच्या थड्यावर पालखी ठेवण्यात आली. गेल्या वर्षभर पाण्याचे दुर्भिक्ष आणि पाऊस न पडल्याने कऱ्हा नदीमध्ये पाणी नसल्याचे चित्र होते. मार्तंडदेव संस्थान त्याचबरोबर जेजुरी नगरपरिषद यांच्या वतीने अग्निशामक दलाच्या माध्यमातून उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून आणि परराज्यातून आलेले लाखो भाविक कऱ्हा नदीच्या ठिकाणी हा आनंद सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते . उत्सवमूर्तींना स्थान घातल्यानंतर त्या ठिकाणी महारती करण्यात आली आणि थोड्याच वेळात पालखीने पुन्हा जेजुरी गडाकडे प्रस्थान ठेवले .येताना वाटेमध्ये भाविक भक्त त्याच बरोबर खांदेकरी मानकर यांच्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे सुविधा त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांनी केल्याचे दिसून आले. सायंकाळी बरोबर सहाच्या दरम्यान पालखी जेजुरीचे ग्रामदैवत जानाई मंदिरा बाहेर भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी जेजुरीतील अनेक भाविकांनी आबाल वृद्धांनी येथे दर्शनाचा लाभ घेतला.
रात्री आठच्या सुमारास शेडा देताच पालखीने गडावर जाण्यासाठी प्रस्थान ठेवले यावेळी गावातील मुख्य पेठेतून पालखी गडाकडे मार्गस्थ होत होती. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी रांगोळ्या आणि फुलांच्या पाय घड्या घालून त्याच बरोबर फटाक्याच्या आतिषबाजी करून भंडाराचे उधळण करत या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोहळा नऊच्या दरम्यान गडाच्या पायथ्याशी विसावला. तेथील भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर पालखी गडावरती निघाली यावेळी अनेक भाविकांनी भंडाराची उधळण करीत आपल्या लाडक्या खंडोबा चे दर्शन घेतले. तसेच पालखी सोहळा गडावर पोचताच मुख्य मंदिराला प्रदक्षिणा करत पालखी सोहळा पुन्हा आपल्या जागेवर विसावला आलेला सर्व भावी भक्तांना रोजमाराचे वाटप करून या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.