येरवडा कारागृहातून पलायन केलेला कैदी आशिष जाधव परतला; आईच्या भेटीसाठी केले होते पलायन

पुणे : येरवडा कारागृहातून पलायन केलेला जन्मठेपेच्या आरोपातील कैदी आशिष भरत जाधव हा बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी स्वत:च सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कारागृहात परतला आहे.

त्याचे आई-वडील त्याला कारागृहात घेऊन आले होते. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी आशिष जाधवने पलायन केले असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. आशिष हा २० नोव्हेंबर रोजी सोमवारी येरवडा येथील खुल्या कारागृहातून पळाला होता. तेव्हा कारागृहात खळबळ माजली होती.

कैदी आशिष जाधव याने सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) येरवडा येथील खुले जिल्हा कारागृहातुन पलायन केले होते. याप्रकरणी, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो हजर झाल्यानंतर याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी आशिष याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वारजे माळवाडी परिसरात २००८ मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात आशिष जाधव याला २०१५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी पासून जाधव हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

Advertisement

तुरुंग प्रशासनाने वर्तवणूक चांगली वाटल्याने त्याला १६ ऑगस्ट २०२२ पासून आशिष जाधवची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. जाधवला कारागृहातील अन्नधान्य विभागात काम देण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी त्याने येरवडा खुले कारागृह येथून पलायन केले होते. आशिष जाधव याचा शोध घेण्यासाठी येरवडा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. यावेळी आशिष जाधवच्या आईला हृद्यविकाराचा झटका आल्याचे सांगितले. जाधवने आईच्या काळ्जीपोटी कारागृहातून पलायन केले होते. बुधवारी (दि. २२) रोजी सकाळी ७:३० च्या दरम्यान आशिष जाधव यांच्या आई वडिलांनी त्याला कारागृहात हजर केले. त्यावेळी आशिष जाधव आणि त्याच्या आई वडिलांना प्रतिक्षालयात थांबवण्यात आले. यानंतर याची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी पलायन करणार्‍या आशिष जाधव याला ताब्यात घेतले.

आशिष जाधवने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले नाही तर खुले कारागृहातून पलायन केले होते. येरवडा खुले जिल्हा कारागृह ही किमान सुरक्षा असलेली शासकीय संस्था असून येथून कैद्याने पलायन करणे कठीण नाही. आशिष जाधवला आईची काळजी वाटल्याने तो पळून गेला होता. मात्र आईची तब्येत बरी असल्याने तो परत कारागृहात दाखल झाला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page